बारामतीत नणंद विरुद्ध भावजय? सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार येणार आमने-सामने?
tv9 Marathi Special Report | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी जोरदार बॅनरबाजी अन् राजकीय वाटचालीसाठी कुणी दिल्या शुभेच्छा? बारामती लोकसभा निवडणुकीकरता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार का?
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | बारामतीत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा होताना दिसतेय. याचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी झळकळेलं बॅनर. राष्ट्रवादीतील गटाची अटीतटीची लढाई पवार कुटुंबियांपर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. कारण बारामती लोकसभा निवडणुकीकरता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार का? याची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक बॅनर लावण्यात आले होते. यावर सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार आणि संसदेचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा असा संदेश यावर लिहिला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील वार्जे भागात हे बॅनर लागल्याने सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट