काका-पुतण्यात अंतर वाढलं का? पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेसह अजित पवार राहणार उपस्थित
याचदरम्यान देश पातळीवर देखील आगामी लोकसभा निवडणुकीवरून राजकारण तापलेलं दिसत आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंगळुरुमध्ये युपीएची अर्थातच विरोध पक्षांची बैठकीत सहभागी होत आहेत.
मुंबई | 18 जुलै 2023 | राष्ट्रवादी पक्षात जुलै महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गचट तयार झाले. तर अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. याचदरम्यान देश पातळीवर देखील आगामी लोकसभा निवडणुकीवरून राजकारण तापलेलं दिसत आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंगळुरुमध्ये युपीएची अर्थातच विरोध पक्षांची बैठकीत सहभागी होत आहेत. तर विरोधाकांना त्यांच्याच खेळीत अडवण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह करताना दिसत आहेत. तर आज राजधानी सत्ताधारी पक्षांची अर्थात NDA ची बैठक होतेय. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार असून त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार आहेत. तर देश पातळीवर दोन गट तयार झाले असून काका-पुतणे हे देखील दोन वेग वेगळ्या गटाच्यांच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय जीवनात आता पुन्हा अंतर वाढलं का? असा सवाल राष्ट्रवादीतच केला जात असून शरद पवार आणि अजित पवार यांचे आता मार्ग हे वेगळे झाल्याचेच दिसत आहे.