Special Report | सत्ता आली तर मस्ती आली का? अजितदादांनी खडसावलं!
प्रकाश सुर्वेंची अशी चिथावणी असो की, शिंदे गटाचेच आणखी आमदार संतोष बांगर यांनी निकृष्ट जेवणावरुन कंपनीच्या व्यवस्थापकाला केलेली मारहाण..यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापलेत...सत्ता आली तर मस्ती आली का ? असे खडेबोल अजित पवारांनी सुनावलेत.
मुंबई : हात तोडा…हात नाही तोडला तर तंगडी तोडा…लगेच टेबल जामीन करुन देतो..अशी जाहीर चिथावणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंनी दिली.. सत्तेत येताच, शिंदे गटाच्या आमदारांची ताकद पाहा किती वाढली, पाय तोडा टेबल जामीन करुन देतो, असं छातीठोकपणे आमदार महोदय सांगतायत, प्रकाश सुर्वेंची अशी चिथावणी असो की, शिंदे गटाचेच आणखी आमदार संतोष बांगर यांनी निकृष्ट जेवणावरुन कंपनीच्या व्यवस्थापकाला केलेली मारहाण..यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) चांगलेच संतापलेत…सत्ता आली तर मस्ती आली का ? असे खडेबोल अजित पवारांनी सुनावलेत.
आता प्रकाश सुर्वे कोणाला इशारा देत आहेत, तेही समजून घ्या…प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला..प्रकाश सुर्वे मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातले आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत सुर्वे आणि मनसेच्या नयन कदमांमध्येच थेट लढत झाली होती…त्यामुळं त्यांच्या रोख मनसेकडेच आहे…