Special Report | नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा झंझावत
कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग येथे डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
ज्या-ज्या जिल्ह्यात लोकांनी जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या लोकांच्या हातात दिल्या त्या बँका सुस्थितीत आहेत. मात्र ज्या बँका चांगल्या लोकांच्या हात गेल्या नाहीत त्या अडचणीत आलेल्या आहेत. हे मी नावानिशी तुम्हाला सांगितले आहे. मराठवाड्यात लातूर बँक चांगली चालली आहे. नाहीतर उस्मानाबाद बँक अडचणीत आहेत. त्यानंतर बीडमधील बँकही अजून म्हणावी अशी चालली नाही. नांदेड जिल्हा बँकही व्यवस्थित नाही, हिंगोली आणि परभणी बँक एकच आहे. तसेच औरंगाबाद ठीक चाललेली आहे. जालना एक ठीक चालली आहे.