Special Report | अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं
अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोले मारल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.दादा हा पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा ‘शो’ नाही, हा ‘शोले' आहे. एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो, हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली? पिक्चर अभी बाकी है’ !!! श्रीकांत शिंदेंनी थेट अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीकडेच अंगुलीनिर्देश केला.
मुंबई : राजकीय नेत्यांचा बाप्पा असो किंवा एखाद्या सोसायटीतलं गणपती मंडळ असो.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या भेटीगाठींचा सपाटा लावलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी गेल्या काही दिवसात मुकेश अंबानी, मिलिंद नार्वेकर, राज ठाकरे, नारायण राणे, प्रसाद लाड, मोहित कंबोज, मनोहर जोशी यांच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलंय. यावरुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. गणरायाच्या दर्शनाला जाताना कॅमेरे घेऊन जाण्याची गरजच काय असा सवाल अजित पवारांनी विचारलाय.
अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोले मारल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.दादा हा पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा ‘शो’ नाही, हा ‘शोले’ आहे. एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो, हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली? पिक्चर अभी बाकी है’ !!! श्रीकांत शिंदेंनी थेट अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीकडेच अंगुलीनिर्देश केला.
2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 48 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. पण हा प्रयोग फसला होता..अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करुन यशस्वीपणे सरकार स्थापन केलं. यावरुनच श्रीकांत शिंदेंनी चिमटा काढलाय आणि कॅमेऱ्यावरुन एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तरही दिलंय.