अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर पार्थ पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.