Ajit Pawar PC Uncut : बीडमधील कोरोना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अजित पवारांच्या महत्त्वपूर्ण सूचना
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे (Ajit Pawat visit beed on corona pandemic).
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा केला. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असा विश्वास अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलाय (Ajit Pawat visit beed on corona pandemic).
कोरोना नियंत्रणासाठी राज्यशासन अनेक उपाय योजना करीत आहे. या प्रयत्नांना यशही आलं आहे. औषधं, आरोग्य सुविधा वाढवतानाच कोरोना लसीकरण गतीने होण्याच्या दृष्टीनं अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.