अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर असल्याचा दावा करणारी याचिका कोर्टाकडून स्वीकरण्यात आली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. विष्णू गुप्ता यांनी अजमेरच्या सिव्हील कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर असल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर असल्याचा दावा करणारी याचिका कोर्टाकडून स्वीकरण्यात आली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. विष्णू गुप्ता यांनी अजमेरच्या सिव्हील कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ही याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टाकडून अल्पसंख्याक मंत्रालय, एएसआय आणि दर्गा कमिटीला नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 20 डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टात दाखल झालेल्या सुनावणीत निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी 1911 मध्ये लिहिलेल्या अजमेर: ऐतिहासिक आणि वर्णनात्मक पुस्तकाचा हवाला दिला आणि असा दावा केला की दर्ग्याच्या बांधकामात मंदिराचा मलबा वापरण्यात आला होता. तसेच, गर्भगृह आणि संकुलात एक जैन मंदिर असल्याचे सांगितले आहे. तर शारदा यांच्या अजमेर: हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह या पुस्तकात सध्याची असणारी इमारत 75 फूट उंच बुलंद दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या ढिगाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये एक तळघर किंवा गर्भगृह आहे, ज्यामध्ये शिवलिंग असल्याचे म्हटले जाते.