दत्तजयंतीनिमित्त भाविकांनी अक्कलकोट नगरी दुमदुमली; स्वामींच्या मंदिरात 1,111 किलोंच्या फळांची सजावट
राज्यभरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसतेय. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल होत आहे. आज दत्तजयंतीनिमित्त स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे.
सोलापूर, २६ डिसेंबर २०२३ : राज्यभरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसतेय. राज्यातील दत्त, स्वामी समर्थ आणि साईबाबा मंदिरात दत्तजयंती साजरी करण्यात येत आहे. तर दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटनगरीत भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळतेय. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल होत आहे. आज दत्तजयंतीनिमित्त स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेली आहे. पहाटे विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर आज दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. श्री. दत्तजयंती निमित्ताने अक्कलकोट मंदिरात 1 हजार 111 किलोंची विविध फळांनी सजावट करण्यात आली आहे.