मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...

मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि…

| Updated on: Apr 26, 2024 | 5:18 PM

बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, अशी ऑफर अकोल्यातील केशकर्तनालयात पाहायला मिळत आहे. अकोला शहराच्या रामदास पेठ येथे अनंत कौलकार यांचे हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या हेअर सलूनमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील ८ मतदारसंघात हे दुसऱ्या टप्प्यातील मतदान होतंय. मतदारांनी आपलं मतदान करून आपला हक्क बजावावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने जनजागृती सुरू असते. अशातच आता अकोल्याच्या एका न्हाव्याची भन्नाट ऑफरने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. बोटाला शाई दाखवा, मोफत कटींग करा, अशी ऑफर अकोल्यातील केशकर्तनालयात पाहायला मिळत आहे. अकोला शहराच्या रामदास पेठ येथे अनंत कौलकार यांचे हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या हेअर सलूनमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…असे घोषवाक्य देखील त्यांच्या सलूनमध्ये लावण्यात आले आहे. सर्वसामान्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा, त्यांनी मतदान करुन येणाऱ्यांची मोफत कटींग सुरु केली आहे. त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अनंत कौलकार यांनी सांगितले.

Published on: Apr 26, 2024 05:18 PM