Akola Night Curfew | अकोल्यात आजपासून रात्रीची संचारबंदी
अकोल्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आजपासून 19 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
अकोल्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आजपासून 19 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.अकोला जिल्हातल्या अकोट मध्ये शुक्रवार पर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 व 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू केली होती. दरम्यान,आता पुन्हा संचारबंदी 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत वाढविण्यात आली आहे. शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबर पर्यंत बंदच राहणार आहे.
Latest Videos