Thane | जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणा
55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे महिलेला तीन डोस दिल्याचे उदाहरण ताजे असताना आता चक्क 55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यानच्या काळात होम क्वॉरन्टाईन राहून घरीच उपचार करुन देसाई बरे झाले होते. पेशाने शिक्षक असलेल्या देसाई यांना मंगळवारी अचानकठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर घरच्या पत्त्याची विचारपूस या महिलेने केली.जिवंत असून मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. (alive man is noted as dead person in thane Minicipal Corporation)
ठाणे पालिकेतील महिलेने चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले ? आम्हाला नोंद करायची आहे ? तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार आहे, प्रश्न विचारले. या महिलेचे हे वाक्य ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळू सरकली असून मी जिवंत असल्याची त्यांनी या महिलेला सांगितले. दरम्यान चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मी जिवंत असून मला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार माझ्यासोबत घडला असल्याचे त्यांनी सांगितले.