Ajit Pawar | 'मास्कबाबत सर्व बातम्या खोट्या', मास्क गरजेचा : अजित पवार

Ajit Pawar | ‘मास्कबाबत सर्व बातम्या खोट्या’, मास्क गरजेचा : अजित पवार

| Updated on: Jan 29, 2022 | 3:05 PM

राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (maharashtra) लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं.

राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (maharashtra) लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क (mask) बाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Published on: Jan 29, 2022 02:03 PM