मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय?

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय?

| Updated on: Sep 11, 2023 | 3:15 PM

VIDEO | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागणीबाबत आज सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन, मराठा आरक्षणासंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस?

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार असून मराठा समाजाला न्याय मिळण्यासंदर्भात सर्वांकडून सूचना येणं अपेक्षित असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्याची भूमिका, असे एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तर मराठा आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कोणतीही बाधा त्या आरक्षणाला कोर्टात टिकणारं असावं, अशीच आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर मराठा आणि ओबीसी समाजात वाद होतील असा निर्णय घेणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे म्हणत मराठा समाजाला आश्वासन दिले आहे.

Published on: Sep 11, 2023 03:15 PM