मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या आजच्या बैठकीत तोडगा निघणार? कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा?
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागणीबाबत आज सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन, मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? कोणत्या मुद्यांवर आज होणार चर्चा?
मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागणीबाबत आज सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सरकार आणि विरोधी पक्ष मिळून आरक्षणाच्या प्रश्नावर आपले मतं मांडणार, समाजाच्या हिताचा विचार करत आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार, तर कोणत्या मार्गाने पुढे जाता येईल यावर चर्चा होणार, मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवर तोडगा निघतो का? यावर मोठी चर्चा होणार असून इतर राज्यात कोणत्या पद्धतीने आरक्षण देण्यात आलं, यावर चर्चा होणार आहे, यासोबतच इतर संघटनांच्या विविध माग्ण्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्याची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाष्य केले आहे. त्यामुळे आता कोणता निर्णय समोर येणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे.