सत्तेत तुम्ही, तरी निधीत कमी? सभेमधून छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?
भिवंडीतील सभेत मंत्री छगन भुजबळ महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत काही आरोप केलेत. मात्र दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून सभागृहात वाद झाला होता. जर सत्तेत तुम्ही आहात आणि तुमच्या शेजारी अर्थमंत्री अजित पवार बसतात मग निधीसाठी कॅबिनेटमध्ये का भांडत नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी मांडलाय.
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : भिवंडीतील सभेत मंत्री छगन भुजबळ महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत काही आरोप केलेत. मात्र दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून सभागृहात वाद झाला होता. जर सत्तेत तुम्ही आहात आणि तुमच्या शेजारी अर्थमंत्री अजित पवार बसतात मग निधीसाठी कॅबिनेटमध्ये का भांडत नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी मांडलाय. सत्तेत मंत्री असलेल्या भुजबळांच्या भूमिकेवर सत्ताधारी पक्षाची भूमिका काय? यावरूनच सावळा गोंधळ सुरू आहे. सभांमधून भुजबळ यांचा सरसकट कुणबीपत्र दिले जाताय असा आरोप आहे. तर सभागृहात भाजप आमदार नितेश राणे भुजबळांच्या मागणीला पाठिंबा देतायत, तर सभागृहाबाहेर गिरीश महाजन म्हणताय सरसकट आरक्षण देण्याचा विषयच नाही आणि शिंदे म्हणताय ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देऊ… बघा सरकारची मराठा आरक्षणाबद्दल नेमकी भूमिका काय?
Published on: Dec 19, 2023 11:39 AM
Latest Videos