विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, टोले-टोमणे, चिमटे अन् वार-पलटवार; नेमकं काय घडलं?

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, टोले-टोमणे, चिमटे अन् वार-पलटवार; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 29, 2023 | 1:54 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका तर अजित पवार यांनी कुशलतेने विषयच बदलला, नेमकं काय घडलं?

मुंबई, 29 जुलै, 2023 | महाराष्ट्राच्या विधानसभेत काल चांगलीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच टोलेबाजी केली. यादरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील टोला मारण्याची संधी सोडली नाही. तर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सर्वात प्रथम नाना पटोले यांनी आक्षेप नोंदविला. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ईर्शाळगडला जाण्यासाठी काही जणांना व्हॅनिटी व्हॅनची गरज लागली, असे म्हणत टीका केली. तर सामनाला दिलेल्या मुलाखतीवरही त्यांनी टोलेबाजी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दोन तीनदा टीका केली, तर अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने विषयच बदलला, नेमकं काय झालं सभागृहात बघा व्हिडीओ…

Published on: Jul 29, 2023 01:51 PM