ईव्हीएम अन् ‘लाडकी बहीण’वरून बाबा आढावांचा सवाल, ‘महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या…’
ईव्हीएमवरून मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत त्यांनी पुण्यातील फुले वाड्यात उपोषण सुरू केलं होतं. शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
ईव्हीएमवरून मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी तीन दिवस आत्मक्लेष उपोषण केलं. यावेळी अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान, बाबा आढाव यांनी अजित पवारांना रोखठोक सवाल केलेत. तर उद्धव ठाकरे यांच्या हाताने पाणी घेत बाबा आढावांनी आपलं आत्मक्लेष उपोषण मागे घेतलं. ईव्हीएमवरून मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत त्यांनी पुण्यातील फुले वाड्यात उपोषण सुरू केलं होतं. शरद पवार, अजित पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आढावांच्या निमित्ताने ईव्हीएमविरोधात ठिणगी पडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या आधी अजित पवार हे देखील उपोषणस्थळी दाखल झालेत. त्याच्यासमोरच आढाव म्हणाले की, वय झालं म्हणजे गप्प बसायचं का? अशा शब्दात संताप व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानात अचानक कसा बदल झाला? असा सवाल आढावांनी अजित पवारांना केला. त्यावर जनतेचा कौल बदलला त्याला कोण काय करणार, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. तर लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी निशाणा साधलाय. बघा नेमकं काय म्हणाले?