WITT Global Summit : पुष्पा सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘नक्षत्र सन्मान’; पुरस्कार प्रदान झाल्यानंतर म्हणाला…
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या वार्षिक कार्यक्रमात मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी, ‘पुष्पा’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या अल्लू अर्जुन काही कारणास्तव कार्यक्रमाचा भाग होऊ शकला नाही. मात्र त्याने टीव्ही 9 नेटवर्क आणि त्याच्या चाहत्यांचे व्हिडिओद्वारे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली | 25 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या वार्षिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमात साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला टीव्ही 9 नेटवर्कचा नक्षत्र पुरस्कार देण्यात आला. ‘पुष्पा’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या अल्लू अर्जुन काही कारणास्तव कार्यक्रमाचा भाग होऊ शकला नाही. मात्र त्याने टीव्ही 9 नेटवर्क आणि त्याच्या चाहत्यांचे व्हिडिओद्वारे आभार मानले आहेत. ‘सध्या मी पुष्पा-2च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. पण माझा हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. चाहत्यांचा पाठिंबा आणि प्रेम याशिवाय हे यश आणि पुरस्कार मिळणं शक्यच नव्हतं’, असं अल्लू अर्जुननं म्हटलं आहे.