Mahayuti Cabinet : महायुतीच्या ‘या’ 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
मंत्र्यांच्या शपथविधीला आतापर्यंत 17 दिवस पूर्ण झालेत आणि या 17 दिवसानंतर सुद्धा नऊ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नसल्याचे दिसतेय. तर महायुतीच्या नऊ मंत्र्यांनी अद्याप का पदभार स्वीकारला नाही, याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरून महायुतीत नाव निश्चित होत नसल्याने शपथविधी लांबणीवर गेला होता. तसेच महायुतीत कोणाला कोणती खाती द्यायची? आणि कोणाला मंत्री करायचे? यावरूनही एकमत नसल्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी लांबणीवर गेल्याची चर्चा होते. मात्र आता मंत्रिपद खातेवाटप झाल्यानंतरही महायुतीच्या नऊ मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याची माहिती समोर येतेय. सहा कॅबिनेट तर तीन राज्यमंत्र्यांनी पदभार अद्यापही स्वीकारलेला नाही. मंत्र्यांच्या शपथविधीला आतापर्यंत 17 दिवस पूर्ण झालेत आणि या 17 दिवसानंतर सुद्धा नऊ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नसल्याचे दिसतेय. तर महायुतीच्या नऊ मंत्र्यांनी अद्याप का पदभार स्वीकारला नाही, याचं कारण अद्याप समोर आलं नाही. महायुती सरकारच्या ज्या नऊ मंत्र्यांनी अद्याप त्यांना मिळालेल्या खात्याचा पदभार स्वीकारला नाही, त्या मंत्र्यांमध्ये दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. तर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री दत्ता भरणे यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाहीये मंत्रीपदाचा. तर सामाजिक न्याय आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जायस्वाल, गृहखाते राज्यमंत्री योगेश कदम यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही.