पक्षप्रवेशाविनाच एकनाथ खडसे भाजप कार्यालयात आले अन्…; सर्वांच्या भुवया उंचावल्या
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हणत खडसेंनी या चर्चांवर भाष्य करत पूर्णविराम दिला होता. अशातच आता पक्षप्रवेशाविना यावलच्या भाजप कार्यालयात एकनाथ खडसे यांनी बैठक घेतल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हणत खडसेंनी या चर्चांवर भाष्य करत पूर्णविराम दिला होता. अशातच आता पक्षप्रवेशाविना यावलच्या भाजप कार्यालयात एकनाथ खडसे यांनी बैठक घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र एकनाथ खडसे यांनी यावलच्या भाजपच्या कार्यालयात हजेरी लावल्याने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच गोंधळात पडले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचना दिल्यात. दरम्यान, पक्षप्रवेश अद्याप झालेला नसताना खडसे भाजप कार्यालयात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर एकनाथ खडसे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे, ‘माझा भाजप प्रवेश निश्चित आहे. त्यामुळे मी २ दिवसांपासून प्रचारात सक्रीय आहे. विनोद तावडे आणि बावनकुळे यांनी माझा प्रवेश निश्चित असल्याचे सांगत प्रवेशाची तारीख आम्ही तुम्हाला कळवू तोपर्यंत तुम्ही कामाला लागा, असे आदेश दिलेत आणि यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा झाली आहे’, असं एकनाथ खडसे म्हणाले.