Special Report | मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एक पण चर्चा अनेक, शिवसेनेच्या मंत्र्याच्या हृदयात विखे अन् मनात शिंदे?
VIDEO | मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या मंत्र्याच्या हृदयात विखे अन् मनात शिंदे, प्रत्येक पक्षाच्या भूमिकेत विसंगती... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एक असली तरी पण त्यावरून चर्चा अनेक होताना दिसताय. दरम्यान शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वक्तव्यांनी भर पाडली आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एक असली तरी मात्र संभाव्य दावेदार अनेक आहेत. मात्र त्यावरून जे दावे-प्रतिदावे सुरू आहेत त्यात बरीच विसंगती दिसून येत आहे. माझी छाती चिरली तर त्यात विखे पाटील यांची छबी दिसेल, असे अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत व्यक्त केले. मात्र काल दुपारी आपल्या हृदयात विखे पाटील आहे असं सांगणाऱ्या सत्तारांनी संध्याकाळी २०२४ साली एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं. तर देवेंद्र फडणवीसही म्हणताय २०२४ ला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, याचा निर्णय हायकंमाड घेणार..अशातच बहुमत असेल तर मुख्यमंत्री पदावर दावा सांगेल असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. मात्र या चर्चा आपल्या कानावर नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले तर अमोल कोल्हे म्हणताय, जयंत पाटील चांगले मुख्यमंत्री होऊ शकतात असा विश्वासही व्यक्त केला.. बघा यासंदर्भतील स्पेशल रिपोर्ट