Kolhapur : अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे, सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा
कोल्हापुरात अमल महाडिकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय सलोखा राहवा म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय.
कोल्हापुरात अमल महाडिकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय सलोखा राहवा म्हणून उमेदवारी मागे घेत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. मुंबईतली भाजपची जागा बिनरोधी झाली. नंदुरबारची निवडणूकही बिनविरोध झाली. त्याच्या बदल्यात कोल्हापूरची जागा त्यांना द्यावी अशी मागणी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचंही भाजपकडून सांगण्यात आल आहे. सदस्या संख्या चांगली असतानाही पक्षाचा आदेश म्हणून अर्ज मागे घेण्यात आली अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. इथून पुढच्या निवडणुकाही भाजपच्या झेंड्याखालीच लढणार असल्याचंही महाडिक यांनी स्पष्ट केलंय.
Published on: Nov 26, 2021 04:21 PM
Latest Videos