नवनीत राणांनी चकल्या, शंकरपाळे केले… पण ‘हा’ पदार्थ येत नाही, पाहा काय म्हणाल्या?
दिवाळी म्हणजे 4-5 किलो (वजन) वाढतं, पण यातूनच आप्तस्वकियांचं एकमेकांबद्दलचं प्रेम दिसून येतं नवनीत राणा म्हणाल्या.
स्वप्निल उमप, अमरावतीः दिवाळीला (Diwali) सुरुवात झालीय, घरोघरी खमंग पदार्थांचा सुवास दरवळतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या घरीही फराळाचे पदार्थ करण्यात आले. नवनीत राणा स्वतःच्या हातांनी फराळाचे पदार्थ बनवतात. टीव्ही9 च्या प्रतिनिधींनी त्यांची यावर प्रतिक्रिया घेतली. राणा यांनीही दिलखुलास उत्तरं दिली. दरवर्षी मी सगळे पदार्थ करते. मात्र अनारसा (Anarsa) करणं मला जमत नाहीत. कारण त्याची पद्धत कठीण असते.. .असं राणा म्हणाल्या. आज चकल्या आणि शंकरपाळे बनवण्याचं माझं टार्गेटच आहे.. असं राणा म्हणाल्या. दिवाळी म्हणजे 4-5 किलो (वजन) वाढतं, पण यातूनच आप्तस्वकियांचं एकमेकांबद्दलचं प्रेम दिसून येतं असंही राणा म्हणाल्या.
Published on: Oct 22, 2022 04:05 PM
Latest Videos