दाट धुकं, वळणांचा रस्ता अन् उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ… बघा आंबा घाटातून निसर्गाचा नजारा

पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कोकणातील आंबा घाटाकडे वळताय. आंबा घाटातील दाट धुक्यात वेड्या वाकड्या वळणांचा हरवलेला रस्ता तर कधी उंचच उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ सध्या कोकणात सुरू आहे. पावसाळ्यामध्ये सह्याद्री हिरवा शालू पांघरून पर्यटकांना साद घालताना दिसतोय

दाट धुकं, वळणांचा रस्ता अन् उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ... बघा आंबा घाटातून निसर्गाचा नजारा
| Updated on: Jul 20, 2024 | 4:35 PM

पश्चिम घाट रागांनी सजलेल्या कोकणातील आंबा घाटात सध्या निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील सौंदर्य अधिकच खुलून आलंय. जिथे नजर जाईल तिथे हिरवा गर्द शालू पांघरलेलं निसर्गाचं सौंदर्य सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे सर्वच पर्यटकांचे पाऊलं आपसूक कोकणाच्या दिशेने पडताय. पावसाळ्यात कोकणातील घाटांचं सौंदर्य बहरलं आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची कोकणातील आंबा घाटाकडे वळताय. आंबा घाटातील दाट धुक्यात वेड्या वाकड्या वळणांचा हरवलेला रस्ता तर कधी उंचच उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ सध्या कोकणात सुरू आहे. पावसाळ्यामध्ये सह्याद्री हिरवा शालू पांघरून पर्यटकांना साद घालताना दिसतोय. पावसाळी पर्यटनासाठी आंबा घाट पर्यटकांसाठी हाँट स्पाँट ठरतोय.. याच आंबा घाटातून निसर्गाचा नजारा कसा आहे बघा व्हिडीओ

Follow us
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी.
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती.
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल.
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'.
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल.
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग.
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?.
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून....