‘वाल्मिक कराड अन् मुंडेंच्या सांगण्यावरूनच देशमुखांची निर्घृण हत्या’, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सनसनाटी आरोप
घुलेनं आपल्या जबाबातील म्हटले की, वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहे. मी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो रिकव्हर झालेत. देशमुखांना जबर मारहाण करण्यात आल्याचा संपूर्ण डेटा पोलिसांकडून सादर करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना तब्बल दोन तास आरोपींकडून मारहाण करण्यात आली, दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी मारहाण करतानाचा पहिला व्हिडीओ आहे तर ५ वाजून ५३ मिनिटांचा शेवटचा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला मारहाण झाली तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली, असं आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख करण्यात आला आहे. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेने सुग्रीव कराडचं नाव सांगितलं, असं देखील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार याने म्हटलंय. तर सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे, अशी माहिती मिळतेय. तर देशमुखांची हत्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झाली, असा आरोप आंबादास दानवे यांचा आहे. दोघांच्या सांगण्यावरून हत्या केल्याचा विषय येणं बाकी आहे. तर पोलिसांच्या चौकशीत सर्व माहिती समोहर येईल, असंही आंबादास दानवे म्हणाले.