अजित पवार गटातील अर्धे लोकं महायुतीत नाराज? कुणाच्या दाव्यानं खळबळ?
अजित पवार गटातील अर्ध्या लोकांना महायुतीत राहायचं नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. अंबादास दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? बघा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी काय केला मोठा दावा?
जागावाटपावर बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार गटातील अर्ध्या लोकांना महायुतीत राहायचं नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. अंबादास दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे आज अजित दादा गटाची बैठक झाली. त्यातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केला आहे’. पुढे त्यांनी असेही सांगितले की, त्यामुळे जागावाटपावर होत असलेल्या कपोल कल्पित तुमच्या बातम्या आहेत. अजून कोणत्याच पक्षाचे काहीही सुरू झालेले नाही, त्यामुळे मला असं वाटते अजून कोणत्याच पक्षाचे जागावाटप झालेले नाही, असं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 23, 2024 05:06 PM
Latest Videos