न्याय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार, कुणी व्यक्त केला विश्वास?

न्याय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार, कुणी व्यक्त केला विश्वास?

| Updated on: Feb 16, 2023 | 7:47 PM

VIDEO | न्याय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार, विरोधी पक्ष नेत्यानं काय व्यक्त केला विश्वास बघा व्हिडीओ

जालना : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावरून ही सुनावणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तसेच शिंदे गटाचे वकील हरिश साळवी आणि नीरज कौल यांच्या वतीने हा युक्तिवाद करण्यात आले. 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचे अधिकार अधोरेखित करणारे दावे-प्रतिदावे पाच सदस्यीय घटनापीठासमोर करण्यात आले. खटल्याची सुनावणी आता सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांनी न्यायउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याला धरून ज्याबाजू मांडल्या गेल्यात त्या शिवसेनेच्या बाजूने आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय घेईल तो निर्णय देशाला दिशादर्शक ठरणार आहे. कारण सगळेजण विश्वासाने न्यायदेवतेकडे बघतात, या विश्वासाला कुठेही तडा जाणार नसल्याची आशाही आंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

Published on: Feb 16, 2023 07:47 PM