‘ते मोर्चे जरी काढत असले तरी ते सत्ताधांऱ्यांचेच’; शिवसेना नेत्याचा कडू यांच्या त्या वक्तव्यावर टोला
याचदरम्यान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी तयारी केली आहे. ती मजबूतीने केली आहे. त्यामुळे निश्चितच आमदार अपात्रतेचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागणार.
औरंगाबाद, 9 ऑगस्ट 2023 । शिवसेना शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. मात्र याचदरम्यान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी तयारी केली आहे. ती मजबूतीने केली आहे. त्यामुळे निश्चितच आमदार अपात्रतेचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने लागणार. त्यावरून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, बच्चू कडू यांच्या विधानातून निर्णय काय द्यायचं हे आधीच ठरलं आहे का याची शंका येते. तर आज कडू जरी आंदोलने आणि मोर्चे काढत असले तरी ते सत्तांधाऱ्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून निर्णय काय येईव याची शंका येते. पण असं जरी असले तरी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक पर्याय आमच्यासमोर आहेत.