Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gajanan Kale on Danve | अंबादास दानवे हे बारामतीचे पोपट, मनसेचे गजानन काळे यांचा तिखट हल्ला

Gajanan Kale on Danve | अंबादास दानवे हे बारामतीचे पोपट, मनसेचे गजानन काळे यांचा तिखट हल्ला

| Updated on: Aug 24, 2022 | 3:38 PM

Gajanan Kale on Danve | अंबादास दानवे हे बारामतीचे पोपट असल्याची घणाघाती टीका मनसेचे गजानन काळे यांनी केली आहे.

Gajanan Kale on Danve | शिवसेनेचे विधान परिषदेतील(Legislative Council) विरोधी पक्षनेते (Opposition leader) अंबादास दानवे (Ambadas Danve) हे बारामतीचा पोपट असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale)यांनी केली आहे. एवढ्यावरच न थांबता दानवे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद ही लॉटरी लागल्याचा टोला ही लगावला आहे. त्यांनी अधिकची बडबड करु नये असा इशारा ही काळे यांनी दिला. औरंगजेबाची औलाद असणाऱ्या एमआयएम नगरसेवकांच्या मतांवर दानवे यांनी विधान परिषद गाठल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची तळी उचलून शिवसेना संपवल्याची जहीर टीका ही प्रवक्ते काळे यांनी केली. काळे यांच्या टीकेने एकच खळबळ उडाली आहे. लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळाले, म्हणून दानवे यांनी काहीही बरळू नये असा इशारा काळे यांनी दिला.

Published on: Aug 24, 2022 03:38 PM