रामानुजाचार्य विनम्र तितकेच विद्रोही – अमित शहा
देशात जेव्हा जातीप्रथा आणि कुप्रथा होत्या, त्याकाळात रामानुजाचार्य यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. तब्बल 120 वर्ष ते जगले. या काळात त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मोठं काम केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
हैदराबाद : देशात जेव्हा जातीप्रथा आणि कुप्रथा होत्या, त्याकाळात रामानुजाचार्य (Shri Ramanujacharya) यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. तब्बल 120 वर्ष ते जगले. या काळात त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मोठं काम केलं आहे. रामानुजाचार्य जसे विनम्र स्वभावाचे होते. तसेच ते विद्रोहीही होते. ज्या समाजाला पूजेचा अधिकार नव्हता त्यांना पूजेचा अधिकार त्यांनी दिला. ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता, त्यांना मंदिरात प्रवेश देण्याचं काम त्यांनी केल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
Latest Videos