शाहांचा जळजळीत हल्लाबोल, आमदार असो वा नेते दादांसोबत तरी शरद पवारांवरील टीका अमान्य, कोणी केला विरोध?

शाहांचा जळजळीत हल्लाबोल, आमदार असो वा नेते दादांसोबत तरी शरद पवारांवरील टीका अमान्य, कोणी केला विरोध?

| Updated on: Jul 23, 2024 | 11:17 AM

अजित पवार यांच्या आमदारांना पवारांवरील टीका मान्य नसून अजित पवार यांच्या गोटातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली. अमित शाह यांची टीका योग्य नाही असं दादांचे आमदार आण्णा बनसोडे यांनी म्हटलं तर विलास लांडे यांनी थेट भाजपच्या नेतृत्वाला म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे यांनाच पत्र लिहिलं

अमित शाहांनी पुण्यातून शरद पवार यांना भ्रष्टाचाराचं सरदार म्हणत जळजळीत टीका केली. पण अजित पवार यांच्या आमदारांना ही टीका मान्य नसून अजित पवार यांच्या गोटातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली. अमित शाह यांची टीका योग्य नाही असं दादांचे आमदार आण्णा बनसोडे यांनी म्हटलं तर विलास लांडे यांनी थेट भाजपच्या नेतृत्वाला म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे यांनाच पत्र लिहिलं. यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, ‘पुणे जिल्ह्याचे भूमिपूत्र आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी आहे. आमचे दैवत व देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका त्वरीत थांबवण्यात यावी ही विनंती’. आमदार असो वा नेते अजित पवार यांच्यासोबत असले तरी शरद पवार यांच्यावर होणारी टीका मान्य नाही, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 23, 2024 11:17 AM