Shah-Fadnavis Delhi Meet | दिल्लीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास चर्चा?
दिल्ली दरबारी गेलेल्या फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना यापुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या नव्याने झालेल्या मंत्र्यांची भेट घेतली.
2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्तारूढ झालेल्या भाजपा सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रीपदी संधी देण्यात आली. तर देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मास्टर स्ट्रोक लगावला. या मंत्रालयामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यातच दिल्ली दरबारी गेलेल्या फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना यापुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या नव्याने झालेल्या मंत्र्यांची भेट घेतली. याचसोबत त्यांनी केंद्रिय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. | Amit Shah Devendra Fadnavis Delhi Meet