Amit Shah : शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्…अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे किल्ले रायगडावर दाखल झालेत. यानंतर अमित शाह यांनी किल्ले रायगडावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील रायगड किल्ल्यावर उपस्थित होते. रायगडावर दाखल झाल्यानंतर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना आदरांजली वाहिली. यासह किल्ले रायगडावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर अमित शाह यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह यांना शिंदे शाही पगडी आणि कवड्याची माळ घालत त्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, अमित शाह यांच्या आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीत मोजक्याच नेत्यांची भाषणे झाल्याचे दिसले.

काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला

भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...

ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं

मनसे, ठाकरे गट युतीची चर्चा, घडामोडींना वेग; दोन बड्या नेत्यांची भेट
