अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
बच्चू कडू यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली परवानगीच रद्द करण्यात आली आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. सुरूक्षेच्या कारणास्तव अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात येत आहे. असं सांगत प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या सभेसाठी दुसरं मैदान देण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली
अमरावतीतील सभेवरून बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. बुधवारच्या सायन्सकोर मैदानाच्या परवानगीनंतर स्टेज उभारण्यापासून पोलिसांनी बच्चू कडू यांना रोखलं. यानंतर बच्चू कडू हे पोलिसांवर चांगलेच भडकले. अखेर बच्चू कडू यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली परवानगीच रद्द करण्यात आली आणि नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. सुरूक्षेच्या कारणास्तव अमित शाह यांच्या सभेला परवानगी देण्यात येत आहे. असं सांगत प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या सभेसाठी दुसरं मैदान देण्यात यावं अशी शिफारस पोलिसांकडून, आयुक्तांकडून करण्यात आली. ही शिफारस मान्यही करण्यात आली मात्र तरीही बच्चू कडू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी होणाऱ्या सभेसाठी बच्चू कडू यांच्याकडून रितसर परवानगी घेण्यात आलीये. त्याच्या पाहणीसाठी बच्चू कडू मैदानात आले. मात्र पोलिसांना त्यांना रोखल आणि अमित शाह यांच्या सभेची माहिती देत सुरक्षेचं कारण दिलं. परवानगी बच्चू कडू यांना मिळाली असली तरी मात्र अमित शाह यांची नवनीत राणांसाठी सभा होणार आहे. यावरूनच बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत, बघा बच्चू कडू आणि अमित शाहांमध्ये काय झाली बाचाबाची?