Special Report | Goa विधानसभेसाठी Amit Shah मैदानात ! -tv9

Special Report | Goa विधानसभेसाठी Amit Shah मैदानात ! -tv9

| Updated on: Jan 30, 2022 | 9:18 PM

अमित शाह यांनी गोव्यात दाखल होताच, पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवलाय. त्यांनी गोव्यात काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवाला आहे. काँग्रेसनं गोव्याला केवळ 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले!, सगळ्या योजना सांगायला गेलो तर एक सप्ताह लागेल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलेबाजी केली आहे.

गोवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत, गोव्यातला प्रचार सध्या जोरात सुरू आहे. पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी भाजप नेत्यांची फौज सध्या गोव्यात रात्रीचा दिवस करत आहे. अमित शाह यांनी गोव्यात दाखल होताच, पहिल्याच प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवलाय. त्यांनी गोव्यात काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवाला आहे. काँग्रेसनं गोव्याला केवळ 432 कोटी दिले होते, भाजपनं 2,567 कोटी दिले!, सगळ्या योजना सांगायला गेलो तर एक सप्ताह लागेल, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलेबाजी केली आहे. छोट्याशा गोव्यात येवढ्या सगळ्या पार्टी का आहेत? अन्य पार्टी येथे आल्या आहेत त्या गोव्याचा विकास नाही करु शकत. काँग्रेसचे सरकार होते अस्थिरता, अराजकता आणि भ्रष्टाचार म्हणून ओळखले जायचे, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.