Devendra Fadnavis | अमित शहांची भेट राजकीय नव्हती : देवेंद्र फडणवीस
भाजप नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल दिल्लीत भेट झाली. बऱ्याच कालावधीनंतर फडणवीस आणि शहा यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
भाजप नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल दिल्लीत भेट झाली. बऱ्याच कालावधीनंतर फडणवीस आणि शहा यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यातही भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रमोशन दिल्यानंतर या भेटीची अधिकच चर्चा सुरू होती. ही राजकीय भेट असल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नेत्यांना आम्ही नेहमी भेटतो, त्यानुसार आताही भेटल्याचं ते फडणवीस म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी परवाच अमित शहांची भेट घेतली. तर फडणवीसांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीत राज्यातील राजकीय घडामोडी आणि भाजपच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर फडणवीस आणि पाटील पार्टी मुख्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांची भाजप नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा झाली. मात्र, या भेटीपेक्षा फडणवीस आणि शहा यांच्या भेटीचीच सर्वाधिक चर्चा रंगली.