Special Report | मनसेकडून वरळीतील जबाबदारी अमित ठाकरेंवर? -Tv9
मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात खास होळीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
मुंबई : राज्यात आज होळीचा सण साजरा होतोय. राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी राजकीय नेते मंडळी देखील या उत्सवात भाग घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील होळी उत्सवात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अमित ठाकरेंनी हजेरी लावल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ही हजेरी नाही ना, अशीही चर्चा सध्या रंगली आहे. मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात खास होळीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या उत्साहाच्या वातावरणात आणि अमित ठाकरेंच्या उपस्थितीत होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिकांची आणि कोळी बांधावांची गर्दी दिसून आली.