‘मला ग्रेट भेटीचं...’, राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरे यांची पोस्ट

‘मला ग्रेट भेटीचं…’, राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरे यांची पोस्ट

| Updated on: Mar 19, 2024 | 5:10 PM

राज ठाकरे यांच्या आताच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडलीय. या बैठकीत मनसेला लोकसभेच्या किती जागा सोडल्या जातील, मनसेचं सत्तेत काय स्थान राहील? याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत. राज ठाकरे यांच्या आताच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडलीय. या बैठकीत मनसेला लोकसभेच्या किती जागा सोडल्या जातील, मनसेचं सत्तेत काय स्थान राहील? याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं, असं अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Published on: Mar 19, 2024 05:10 PM