Amol Kolhe | राजनाथ सिंह यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन नवा वाद, अमोल कोल्हे यांनी नोंदवला निषेध

Amol Kolhe | राजनाथ सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन नवा वाद, अमोल कोल्हे यांनी नोंदवला निषेध

| Updated on: Aug 28, 2021 | 7:31 PM

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. 

मुंबई  : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. खरा आणि नि:पक्षपाती तर्कसंगत इतिहास महाराष्ट्राबाहेर देशभरात व जगभरातही पोहोचायला हवा, अशी प्रतिक्रया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

“कुणी एक हिंदी दिग्दर्शकसुद्धा मुघलशासक हे राष्ट्रनिर्माते होते अशी मांडणी करू पाहतो तेव्हा याचा आणखी गांभीर्याने विचार व्हायला हवा.
जे आहे ते उजळ माथ्याने मांडायला हवे , ज्याचे जे आणि जेवढे योगदान आहे तेच समोर यायलाही हवे. परंतु अकारण स्तोम माजवून माथी मारण्याचे प्रकार थांबवायला हवेत. ही प्रबोधनाची वैचारिक लढाई त्याच माध्यमातून लढायला हवी.केलेला निषेध अथवा आंदोलन क्षणिक ठरू शकते. परंतु साहित्य, कलाकृती यांचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो याचा विचार व्हायला हवा, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

Published on: Aug 28, 2021 07:31 PM