अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...

अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्…

| Updated on: May 14, 2024 | 3:24 PM

मतदारांना पाचशे रूपये देऊन मतांची खरेदी केली असा आरोप शरद पवार गटाकडून शिरूर मतदारसंघातून लोकसभा लढवणाऱ्या अमोल कोल्हे यांनी ट्विटमधून केला. ५०० रूपये देऊन मतांची आणि लोकशाही थट्टा केल्याचा आरोपही अमोल कोल्हेंनी केला. बघा काय म्हणाले अमोल कोल्हे....

मतदारांना पाचशे रूपये देऊन मतांची खरेदी केली असा आरोप शिरूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शरद पवार गटाकडून शिरूर मतदारसंघातून लोकसभा लढवणाऱ्या अमोल कोल्हे यांनी ट्विटमधून हा आरोप केला आहे. ५०० रूपये देऊन मतांची आणि लोकशाही थट्टा केल्याचा आरोपही अमोल कोल्हेंनी केला. ट्वीट करत कोल्हे यांनी असे म्हटले की, शिरोली, खेड ठाकरवाडी असे कॅप्शन देत त्यांनी मतदारांना ५०० ची नोट देतांनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ५०० रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना शिकवतील, असे म्हणत विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे.

Published on: May 14, 2024 03:21 PM