अमोल कोल्हे म्हणतात, मी जे करतो, त्यात इतिहासाची लाईन

अमोल कोल्हे म्हणतात, मी जे करतो, त्यात इतिहासाची लाईन

| Updated on: Sep 15, 2022 | 8:43 PM

राष्ट्रभक्ती ही काही कुणाची मक्तेदारी नाही. त्यामुळं राष्ट्र प्रथम ही माझी भावना आहे. ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते अमोल कोल्हे सांगणार आहेत. हे सांगत असताना राजकीय चर्चा रंगली. त्यावर कोल्हे म्हणाले, राजकीय व्यासपीठावरून सोयीची भूमिका घेता येते. पण, शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत असताना परखड आणि खरं असलेलंच सांगावं लागते. ज्या गोष्टी घडल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात येणार असल्याचं अभिनेता अमोल कोल्हे म्हणाले. राष्ट्रभक्ती ही काही कुणाची मक्तेदारी नाही. त्यामुळं राष्ट्र प्रथम ही माझी भावना आहे. ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

Published on: Sep 15, 2022 08:43 PM