‘लाडक्या बहिणींनी’ पायताण काढावं… राणांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अमोल कोल्हे भडकले तर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात एकच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. निवडणुकीमध्ये आशीर्वाद न दिल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० रूपये काढून घेणार असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
‘दिवाळीनंतर राज्यातील महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, असे मी मागणी करेन… तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये बहिणांना देण्यात यावे. पण हे कधी म्हणता येईल, जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिले नाही. मी तुमचा भाऊ आहे, ते १५०० रूपये तुमच्या खात्यातून परत घेईन, असं मिश्किल वक्तव्यही अमरावतीत रवी राणांनी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यानंतर विरोधकांनी सरकार आणि रवी राणा यांच्यावर एकच निशाणा साधत जोरदार टीका केली. ‘मतदार बहिणींना रवी राणा सरळ धमकी देत आहेत. फक्त मतदार बघून हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू आहे. मतदानावर डोळा ठेवून असं वक्तव्य रवी राणांनी केलं. बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येत नाही. भाजपच्या लोकांना आपल्या खुर्चा अबाधित ठेवायच्यात’, असं सुषमा अंधारे म्हणाल्या तर रवी राणांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे देखील भडकल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले अमोल कोल्हे?