NCP Amol Mitkari | तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामा, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंवर पोस्ट

NCP Amol Mitkari | तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामा, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंवर पोस्ट

| Updated on: Jul 14, 2021 | 1:18 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. त्याची चर्चा रंगत असतानाच आता या वादात राष्ट्रादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. 

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून हा सल्ला दिला आहे. या ट्विटमधून मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्लाही चढवला आहे. ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं आवाहनही मिटकरी यांनी केलं आहे. मिटकरी यांच्या या सल्ला वजा खोचक ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. त्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.