“खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच, शिंदे यांच्या मेळाव्याला काही अर्थ नाही”, राष्ट्रवादीच्या आमदाराचे टीकास्त्र
काल शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक: काल शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे.असं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून भरत गोगावले यांचं प्रतोद पद बेकायदेशीर आहे, तसेच एकनाथ शिंदे हे गटनेते म्हणून बेकायदेशीर असल्याने, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जो काही मेळावा होत आहे, त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं”, असं मिटकरी म्हणाले. “तसेच विधान परिषदेत आता बरोबरीचे संख्याबळ आहे.जर महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घेतला, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटणं साहजिक आहे.भाजपला वेठीस धरायचे असेल आणि त्यांची कोंडी करायची असेल, तर एकनाथ खडसे हे अभ्यासू आहे,” असं देखील अमोल मिटकरी म्हणाले.