बच्चू कडू यांचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? अमोल मिटकरी यांचा मोठा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय. सध्याच्या सरकारविरूद्ध बच्चू कडू यांनी सातत्याने विद्रोहाची भूमिका घेतली. यामुळे या अपघातामागे सत्ताधारी तर नाही ना? त्यांचा अपघात आहे की घातपात आहे?
अकोला : Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय. सध्याच्या सरकारविरूद्ध बच्चू कडू यांनी सातत्याने विद्रोहाची भूमिका घेतली. यामुळे या अपघातामागे सत्ताधारी तर नाही ना? त्यांचा अपघात आहे की घातपात आहे? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी टीव्ही-९शी बोलताना उपस्थित केलाय. बच्चू कडू म्हणजे खुल्या मनाचे राजकारणी आहेत. मनात जे असेल ते बोलतात. आमचे राजकीय मतभेद आहेत. त्यांचा व माझा पक्ष वेगळा आहे. परंतु त्यांनी दिव्यांगासाठी केलेलं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. अमोल मिटकरी यांच्या दाव्यामुळे खळवळ माजली आहे.
Published on: Jan 12, 2023 02:47 PM
Latest Videos