VIDEO : अमरावतीत संतापजनक प्रकार, गुप्तांगातून Swab घेणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा | Amravati | Corona Test
कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार दीड वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती .या प्रकरणातील आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार दीड वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती .या प्रकरणातील आरोपीला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकारानंतर सर्वच स्तरातून संतापाची लाट उमटली होती. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी अलकेश देशमुख याच्या विरुद्ध बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. तरुणीच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर टेक्निशियन अलकेशने तिच्या गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतल्याचा आरोप झाला होता. त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.