Amravati Election Exit Poll 2024 : अमरावतीत तिरंगी लढत, लोकसभेत नवनीत राणांची आघाडी की पिछाडी?

Amravati Election Exit Poll 2024 : अमरावतीत तिरंगी लढत, लोकसभेत नवनीत राणांची आघाडी की पिछाडी?

| Updated on: Jun 01, 2024 | 8:16 PM

भाजपकडून नवनीत राणांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी चांगलाच विरोध केला होता. त्यानंतर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेतील दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरशीचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.

यंदाच्या लोकसभेतील सर्वात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ…यावेळी अमरातवीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून यावेळी नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. दरम्यान, भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. नवनीत राणांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी चांगलाच विरोध केला होता. त्यानंतर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेतील दिनेश बूब यांना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरशीचा सामना झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अमरावतीतील उमेदवाराचा निकाल समोर आले आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर आहेत तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बूब हे पिछाडीवर आहे.

Published on: Jun 01, 2024 08:16 PM