देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महायुतीच्या विरोधात प्रचार करत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
भाजपकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय? अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महायुतीच्या विरोधात प्रचार करत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार असेही म्हणाले, संसदेत आम्ही बसतो. खासदारांशी गप्पा गोष्टी करतो. पार्लमेंटमध्ये सेंट्रल हॉल आहे. त्या ठिकाणी राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो, मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल शरद पवारांनी केला.