नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमकं काय म्हणाले?

नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 11, 2024 | 2:31 PM

महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. असातच आमदार रवी राणा यांच्या एका वक्तव्याने चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेत्या नवनीत राणा यांच्याबद्दल अमरावतीचे आमदार आणि पती रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. नवनीत राणा विधानसभा निवडणूर लढवणार नाही, असं मोठं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. नवनीत राणा या विधानसभेला भारतीय जनता पक्षाचा प्रचार करतील, असंही रवी राणांनी म्हटलं. ‘भाजप, कमळाचे उमेदवार निवडून यावेत, अशी भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांची इच्छा आहे. पण मला असं वाटतं नवनीत राणा स्वतः विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत. तर त्या फक्त भाजपाचा प्रचार करतील.’, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. पुढे रवी राणा असेही म्हणाले की, ‘चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वारंवार असं सांगितले की, नवनीत राणा राज्यसभेत जाणार आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासाठी राज्यसभाच योग्य आहे’, असा वक्तव्य करत रवी राणा यांनी नवनीत राणांप्रती विश्वासच व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 11, 2024 02:31 PM